चाकणचा कायापालट: गर्दीच्या गर्तेतून भूमिगत रेल्वेकडे


विकास म्हणजे रस्ते, औद्योगिक प्रकल्प इतकेच नसत. त्यासाठी दळणवळणाची साधन कमी खर्चात निर्माण देखील करावे लागतात. चाकणसारख्या गावात एमआयडीसी येते काय आणि त्याचे कायापालट होते काय हे आपण पाहतोय. आर्थिक, सामाजिक बदल घडतात, व्यवसाय निर्माण होतात पण त्याचबरोबर येतो तो बेरोजगार लोकांचा लोंढा. ह्या लोकांना यावे लागते कारण जगण्याचा प्रश्न, पैसे कमावणे, घर चालवणे, समाजाच्या गतीबरोबर राहणीमान करण्यासाठी कामाशिवाय त्यांना पर्याय नसतो आणि कामासाठी स्वतःच्या गावात संधी मिळाली नाही की मिळेल ते काम करण्यासाठी स्थलांतर होते. हे स्थलांतर मग गर्दीचे स्वरूप तयार होते. आणि ही गर्दी मग राहण्याचा, प्रवासाचा बोझा वाढल्यावर आजचे चाकण उभे राहते. दोष देत नाही पण रोजगाराची सुविधा, संधी ह्याचे विकेंद्रीकरण करणे आज काळाची गरज आहे. अश्यातच विकासाच्या नावावर रिंग रोड, महामार्ग बनवणे, एकाचे दोन लेन, दोनचे चार लेन केले तरी रस्त्यावर गर्दी आहे ती आहे अश्यावेळी गावागावांना, शहरांना जोडण्यासाठी, लोकांना स्वस्त,रास्त, वेगवान प्रवासासाठी एकमेव दुसरा पर्याय म्हणजे रेल्वे. पण आमच्याकडे रेल्वे आहेच कुठे? रेल्वेसाठी जागा आणायची कुठून? प्रत्येकवेळी विकासाचे नाव पुढे करून रस्ते बनवणारे सरकार किती वेळा लोकांच्या जागा घेणार? लोक किती जागा देणार? हो त्यांना मोबदला मिळतो पण ते काय स्वतःच्या मनाने जागा देतात का? बर एखाद्या श्रीमंतच्या, राजकारणी लोकांच्या जागेतून रेल्वे जात असेल तर ते त्याचा नियोजित मार्ग बदलतात आणि अश्यावेळी गरीब, गरजवंताला, जागेशिवाय दुसरे काही नसणाऱ्या आवडत नसताना, बळजबरीने जागा द्याव्या लागतात. असाच एक प्रकल्प जो मी माझ्या लहानपणापासून ऐकतोय तो म्हणजे चाकण मधून रेल्वे जाणार.

 नाशिक रेल्वे हे मागील ३० ते ४० वर्षांपासून भिजत ठेवलेले घोगड आहे की ते कधीच पूर्ण होणार नाही. पूर्वी दूरदृष्टी नसलेले राजकारणी आणि आता सोन्याच्या भाव झालेल्या जागा, शेतकऱ्यांच्या जागा जाण्याची भीती यामुळे हा प्रकल्प अस्तित्वात येणार नाही. चाकण विमानतळ, रेल्वे गरजेच्या पण आता एवढी जागा आणायची कुठून? जिकडे तिकडे इमारती, परराज्य आणि राज्यातून नोकरीसाठी आलेले गरजू यामुळे चाकण इतके फुगले आहे की लाख मोलाची जमिनीचे भाव गगनाला भिडले आहे अश्यातच छोटे वा मोठे शेतकरी याच्या जमिनी यात गेल्या तर आयुष्यभर स्वतःच्या जागेतून रेल्वेची ये जा पाहत बसतील. याच लोकाचा विरोध आणि सध्याचे आमदार,खासदार यांच्यात झालेले रेल्वे नको ह्या समांतर मत याच विचार करता रेल्वे येईल हे फक्त एक स्वप्न राहणार आहे पण रेल्वेचे फायदे काय हे ही जनता, सरकार जाणते. रस्त्यावरची प्रचंड गर्दी, ट्रॅफिक समस्या, वैध अवैध, सरकारी किंवा खाजगी वाहतूक व्यवस्था, त्याला लागणारे प्रचंड इंधन आणि होणारा प्रत्येक माणसाचा खर्च पाहता रेल्वेची गरज खूप जास्त.  रेल्वे बांधणी खर्चिक असली तरी एकदा का ती बनली की त्यावर दुरुस्ती खर्च फार कमी असतो असे आपण शाळेत असल्यापासून शिकलो आहे मग काळाची गरज ओळखता आणि शेतकऱ्याच्या किंवा भूमिपुत्रांच्या भूमी हस्तगत न करता ही दिव्य साकारायचे कसे? भविष्यात जमिनी मिळतील असे वाटत नाही तर सरकारने वाहतूक व्यवस्था अद्यावत करण्यासाठी दुसरे प्रकार योजले पाहिजे. माझ्या मते नवीन जागा हस्तगत करण्यापेक्षा आहे त्याच पुणे नाशिक महामार्गाच्या खालील भूमिगत  रेल्वेचा प्रस्ताव ठेवला पाहिजे. हा थोडा खर्च वाढेल पण जागेचा प्रश्न सुटेल. वेडावाकडा रेल्वे मार्ग हे अवघड काम,मधेच येणारे डोंगर दऱ्यामुळे गरजेनुसार भूमिगत रेल्वे आपला मार्ग पुणे नाशिक रस्त्याच्या आजुबाजूला सरकू शकतो पण यामुळे रेल्वे साठी लागणाऱ्या खूप मोठ्या जागेचा प्रश्न सुटू शकतो. हे काम सोप्प नाही, खर्चिक आहे आणि अशक्यप्राय आहे हे मान्य पण आजच्या घडीला प्रवाहाशिवाय वेगळा विचार केल्याशिवाय प्रगती साधता येणे अशक्य. मांडलेला ह्या विचारावर कोणी विचार देखील केला असेल नसेल पण एक पर्याय म्हणून निदान यावर सरकारने काम केल्यास देशात अनेक ठिकाणी जिथे जागाच नाही अशा ठिकाणी रेल्वेचा प्रसार होऊ शकतो. प्रवास स्वस्त, वेगवान करण्यासाठी काळाच्या गतीबरोबर धावण्यासाठी, रस्त्याची रहदारी कमी करण्यासाठी, स्वस्तात प्रवास, गाव ते शहर जोडण्यासाठी काही तरी वेगळे करावे लागेल. भारत आत्ताच सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनला पिछाडीवर घातले आहे. त्यात काही धार्मिक कट्टरवादी विचार असलेले लोक त्याची संख्या वाढावी म्हणून खूप प्रयत्नशील असताना भारतात जमिनी मिळणे भविष्यात अवघड काम होणार आहे. जागाच नसेल तर सरकार हातावर हात ठेवून थोडीच बसू शकणार आहे? पर्याय तर शोधले पाहिजे. केवळ एखादा गट, अडाणी राजकारणी, त्याचे वैयक्तिक किंवा सार्वजनिक स्वार्थ यामुळे प्रगती तर थांबता येणार नाही. मला माहिती आहे की अशी योजना राबवण्याची कल्पनाच स्वप्नवत आहे त्यामुळे ती अतित्वात येणे अवघडच पण ह्याव्यतिरिक्त भविष्यात भारताकडे दुसरा पर्याय देखील नसणार आहे हे देखील तितकेच मोठे सत्य असणार आहे. 
असो... एक सामान्य माणूस म्हणून मी माझ्या मनातील खदखद लेखाद्वारे बाहेर काढतो त्याव्यतिरिक्त करण्यासाठी माझ्याकडे ना आर्थिक ताकद आहे ना सामाजिक त्यामुळे हे उद्बोधन.

पुढचा लेख घेऊन येईपर्यंत माझा छोटासा स्वल्पविराम...

धन्यवाद..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रपती

तिरुपती बालाजी: जगातील सर्वात श्रीमंत देवाच्या संपत्तीचे 'हे' आहे रहस्य!

मुक्त विद्यालय (Open School)