छत्रपती
राजा शिवाजी चित्रपटाचा टिझर पहिला आणि त्यातील कलाकाराचा जथ्था पाहून थक्क झालो. बॉलिवूडमधील एक काळ गाजवलेले अनेक प्रतिष्ठित,प्रसिद्ध कलाकार रितेश देशमुख याच्या मैत्रीच्या जोरावर चित्रपटात गर्दी केली आहे हे दिसते.चित्रपट चांगला असावा अशी माझी खूप इच्छा आहे पण सध्यातरी दिसताना तो भव्यदिव्य वाटला नाही किंवा चित्रण मनाला भावले नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे रितेशमध्ये शिवरायाचे ते रूप मला दिसले नाही. महाराष्ट्रातील जनतेचे मत माझ्या मतांच्या विरुद्ध असण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी मला छत्रपती शिवाजी महाराज रितेशच्या रुपात दिसले नाही कदाचित रितेशने वाढवलेली दाढी आणि केसात जनमानसात, बिगबॉस कार्यक्रमात हजेरी लावून लोकांना ते रूप खूप सोप्या पद्धतीने दाखवत राहिल्याने चित्रपटातील त्या रूपाची उत्कंठता कमी झाली असावी. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या नाही तर अखंड हिंदुस्थानचे अस्मितेचे प्रतीक आहे. महाराष्ट्रच नाही तर अखंड हिंदुस्थान आणि हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदूच्या मनातील दैव समान दैवत आहे.
"शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी, राखी हिंदुवानी, हिंदुवानको तिलक राख्यौ" हे कवी भूषण यांनी रचलेले प्रसिद्ध काव्य आहे. या वाक्याचा अर्थ, जर छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर या देशातील हिंदू धर्माचे अस्तित्व धोक्यात आले असते आणि सर्वांचे जबरदस्तीने धर्मांतर झाले असते असा आहे. आज हिंदुस्थानातील प्रत्येक सनातनी,हिंदू म्हणून जगणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावर टिळा लावण्याची हिंमत छत्रपती शिवाजी महाराज याच्या कर्तृत्वामुळे शक्य झाली आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा विषयच असा आहे रितेशच काय आजपर्यंत कित्येक कलाकारांनी त्याचे रूप रंगभूमीवर वठवण्याचा प्रयत्न केला आहे पण प्रत्येकजण त्यात यशस्वी झळच असेल नाही पण केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी अनेकाना लोकांनी त्या रूपात स्वीकारले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची, देहबोली, बोलणे, चालणे, तेजस्वी चेहरा, प्रतिशिवाजी रूप नसताना काहीना लोकांनी स्वीकारले ते केवळ राजांवरील प्रेमापुढे. अशा बहुतेक सर्व कलाकाराची नावे त्याचे चित्रपट याची यादी खालीलप्रमाणे. कदाचित एखाद दुसरे नाव लिहिण्यात राहून गेले असेल पण जास्तीत जास्त अचूक शोधाशोध करून ही यादी तुमच्यापुढे मांडत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेल्या कलाकारांची यादी (सालानुसार)
१९२३: बाबूराव पेंटर (मूकपट: सिंहगड)
१९२४: बाबूराव पेंटर (मूकपट: कल्याणचा खजिना)
१९२७: व्ही. शांताराम (मूकपट: नेताजी पालकर)
१९३०: मास्टर विठ्ठल (मूकपट: स्वराज्याचे तोरण)
१९४४: गजानन जागीरदार (चित्रपट: रामशास्त्री)
१९५०-६०: सूर्यकांत मांडरे (चित्रपट: स्वराज्याचा शिलेदार, धन्य ते संताजी धनाजी)
१९५०-७०: चंद्रकांत मांडरे (चित्रपट: पावनखिंड, मोहितेची मंजुळा आणि इतर)
१९७३: शिवाजी गणेशन (तमिळ चित्रपट: भक्त तुकाराम)
१९७३: अक्किनेनी नागेश्वर राव (तेलगू चित्रपट: भक्त तुकाराम)
१९८१: आनंद जोशी (चित्रपट: बाल शिवाजी)
१९८७: रमेश देव (चित्रपट: सर्जा)
१९८७: धीरज कुमार (हिंदी मालिका: शिवाजी महाराज - DD)
१९८८: नसीरुद्दीन शाह (हिंदी मालिका: भारत एक खोज)
१९९०: रमेश देव (मराठी मालिका: श्रीमंत योगी)
१९९४: शहबाज खान (हिंदी मालिका: द ग्रेट मराठा)
२००४: अविनाश नारकर (मराठी मालिका: छत्रपती शिवाजी - ई-टीव्ही)
२००५: अशोक समर्थ (चित्रपट: छत्रपती शिवाजी)
२००८: डॉ. अमोल कोल्हे (मराठी मालिका: राजा शिवछत्रपती - स्टार प्रवाह)
२००९: महेश मांजरेकर (चित्रपट: मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)
२०११: पारस अरोरा (हिंदी मालिका: वीर शिवाजी - तरुण शिवराय)
२०१२: डॉ. अमोल कोल्हे (हिंदी मालिका: वीर शिवाजी - मोठे शिवराय)
२०१३: नावेद अस्लम (हिंदी मालिका: जोधा अकबर)
२०१७: सिद्धार्थ निगम / आदित्य रेडीज (हिंदी मालिका: पेशवा बाजीराव)
२०१८: चिन्मय मांडलेकर (चित्रपट: फर्जंद - शिवराज अष्टक)
२०१८: शांतनू मोघे (मराठी मालिका: स्वराज्यरक्षक संभाजी)
२०१९: प्रसाद ओक (चित्रपट: हिरकणी)
२०१९: चिन्मय मांडलेकर (चित्रपट: फत्तेशिकस्त)
२०२०: शरद केळकर (हिंदी चित्रपट: तान्हाजी: द अनसंग वॉरियर)
२०२१: भूषण प्रधान (मराठी मालिका: जय भवानी जय शिवाजी)
२०२२: चिन्मय मांडलेकर (चित्रपट: पावनखिंड / शेर शिवराज)
२०२२: गश्मीर महाजनी (चित्रपट: सरसेनापती हंबीरराव)
२०२२: सुबोध भावे (चित्रपट: हर हर महादेव)
२०२३: चिन्मय मांडलेकर (चित्रपट: सुभेदार)
२०२३: अक्षय कुमार (चित्रपट: वेडात मराठे वीर दौडले सात)
२०२५: सिद्धार्थ बोडके (चित्रपट: पुन्हा शिवाजीराजे भोसले)
२०२५: लक्ष्मण उतेकर (आवाज - चित्रपट: छावा)
यानंतरही अनेक जण शिवाजी महाराजांचे रूप घेऊन आपल्या समोर येत राहतील. मी पाहिलेले कलाकारांपैकी चंद्रकांत, सूर्यकांत या भावांनी साकारलेले छत्रपतींचे रूप ह्याला तोड नाही. शांतनू मोघे, चिन्मय मांडलेकर, शरद केळकर, गश्मीर महाजनी यांना अनेकांनी पसंती दिली होती आणि व्यक्तिशः मला देखील छत्रपतीच्या रूपात पाहताना आनंद झाला होता. अनेक कलाकाराचे प्रतिशिवाजी रूप पाहिले नाही पण काहींनी पडद्यावर जो महाराज साकारला आहे ते पाहून डोळ्याची पारणे फिटतात हे मात्र खरे. अमोल कोल्हेने रंगवले रूप बहुतांश लोकांना आवडले असले तरी मला मात्र ते आवडले नव्हते, आवडणार नाही. आधी म्हटल्यासारखे माझे आणि तुमचे मतांतर असण्याची दाट शक्यता आहे पण लेख माझा, विचार माझे म्हणून मी हे माझे मत तुमच्यापुढे व्यक्त करतोय. हा आता तुम्हाला काही वेगळे मत मांडायचे असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच तर खुला आहे.
लिहू तितके थोडे असलेला छत्रपती शिवाजी महाराज विषयाची सांगता कशी करायची हे मला समजत नाही पण माहितीपर हा लेख इथेच थांबवतो आणि पुढील लेखापर्यंत जय महाराष्ट्र म्हणतो.........
#ShivajiMaharaj
#ChhatrapatiShivajiMaharaj
#RajaShivaji #Swarajya #Maharashtra
#Shivray #छत्रपतीशिवाजीमहाराज
#शिवाजीमहाराज #स्वराज्य
#RiteshDeshmukh
#RiteshDeshmukhAsShivaji
#MarathiCinema #MarathiMovies
#HistoricalCinema #AmolKolhe
#ChinmayMandlekar #SharadKelkar
#ShivrajAshtak #मराठीचित्रपट #ऐतिहासिक
#Kathavachak
#MarathiBlog #NewPost #MarathiWriter #BlogUpdate #Review #मराठीलेख #कथावाचक #ब्लॉग
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा