निवेदन: क्षणभर विश्रांती....
नमस्कार वाचकांनो, आज लेख नाही, कथा नाही किंवा शैक्षणिक,सामाजिक विषयावर बोल नाही कारण आज मी तुम्हाला एक विनंती करण्यासाठी माझे चार शब्द लिहित आहे. काही तांत्रिक आणि वैयक्तीत कारणामुळे पुढचे काही दिवस kathavachak137.blogspot.com वर येणारे लेख बंद राहतील. हा निर्णयापर्यंत येणे खूपच अवघड होत पण जोपर्यत काही अडचणी दूर होत नाही तोपर्यंत लेका करणे, लेखांसाठी डोक्यात विचार येणे अवघड आहे. मला माहित आहे की ही तुमच्यासाठी अवघड आहे पण महाकठीण माझ्यासाठी आहे. लिहायचा छंद, वेगवगेळ्या गोष्टी, आध्यात्मिक विषय तुमच्यासमोर आणण्याचा माझा उपक्रम केवळ वाचकाना निखळ आनंद देणारे साहित्य द्यावे एकटाच होता. लिहणे थांबणार असलो तरी माझा वाचक म्हणून प्रवास चालूच आहे. व पू काळे, पू ल देशपांडे याच्या अनेक कथानके कित्येकदा वाचूनही माझ्या चेहऱ्यावर हसू फुलते तो वाचनाचा आनंद कोणत्या लेखातून मिळेल ही शोधमोहीम थांबण्याचा प्रश्न नाही पण लेखनातील छोटीशी क्षणभर विश्रांती घ्यावीच लागेल असे दिसत आहे. ही विश्रांती क्षणभर असेल याची दक्षता मी घेईल आणि आपल्या लेखमालिकेत पुन्हा तुमच्यासमोर हजर होईल इतक प्रेमपूर्व...