ब्लॉग ११४: संत शिरोमणी नामदेव महाराज: भक्त प्रल्हादापासून तुकोबांपर्यंतचा एक विराट भक्ती प्रवास

रामराम मंडळी मी कथावाचक,


डसंत शिरोमणी नामदेव महाराज: भक्त प्रल्हादापासून तुकोबांपर्यंतचा एक विराट भक्ती प्रवास

काय मग कशी चाललीये धावपळ आज आपण अशा एका थोर महात्म्याबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यामुळे वारकरी धर्माची ही उत्तुंग इमारत उभी राहिली आणि ज्यांनी भक्तीचा मार्ग इतका सोपा करून दिला की सामान्य माणसालाही पांडुरंग आपला वाटू लागला तो महात्मा म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज वारकरी संप्रदायामध्ये एक म्हण फार प्रसिद्ध आहे की संत कृपा झाली इमारत फळा आली पण या भव्य इमारतीचा पाया रचण्याचं आणि जगाला ज्ञानदीप दाखवण्याचं मोलाचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे नामदेवराय नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अशी खणखणीत प्रतिज्ञा करून या माणसानं महाराष्ट्रापासून ते पंजाबच्या मातीपर्यंत विठ्ठल नामाची पताका फडकवली ते केवळ महाराष्ट्राचे संत नव्हते तर ते भारताचे पहिले सांस्कृतिक दूत होते ज्यांनी विठ्ठल भक्तीचा सुगंध सर्वत्र दरवळत ठेवला

नामदेव महाराजांच्या आयुष्याकडे पाहताना आपल्याला जाणवतं की हा प्रवास केवळ एका जन्माचा नाहीये तर यामागे एक मोठा आध्यात्मिक इतिहास आणि पुरावा आहे वारकरी धर्मातली श्रद्धा आणि पुराणातले संदर्भ सांगतात की नामदेवराय हे साक्षात भगवान विष्णूच्या एका चैतन्यमय अंशाचा अवतार होते त्यांच्या या आत्म्याचा प्रवास चार युगांतून असा उलगडत जातो की ऐकताना अंगावर काटा येतो सत्ययुगामध्ये जेव्हा हिरण्यकश्यपूने अन्यायाचा सुळसुळाट केला होता तेव्हा देवावर अढळ श्रद्धा ठेवणारा तो छोटा भक्त प्रल्हाद म्हणजे नामदेवरायांचा पहिला अवतार होता ज्याच्यासाठी भगवंताने खांबातून नरसिंह अवतार धारण केला पुढे त्रेतायुग आलं तेव्हा प्रभू श्रीरामाच्या काळात ते वानरराज वालीचा पुत्र अंगद म्हणून जन्माला आले रावणाच्या दरबारात आपला पाय असा रोवला की जगातल्या कोणत्याही शक्तीला तो हलवता आला नाही रामाचा तोच अनन्य दूत म्हणजे नामदेवरायांचा पूर्वजन्म होता

द्वापारयुगामध्ये हेच नामदेवराय श्रीकृष्णाचे परम सखा आणि मंत्री उद्धव बनले उद्धवाला आपल्या ज्ञानाचा मोठा गर्व होता पण श्रीकृष्णाने गोपींच्या निस्सीम प्रेमाद्वारे त्याचा तो गर्व उतरवला आणि श्रीकृष्णाने जेव्हा निजधामाला जाण्याची तयारी केली तेव्हा उद्धवाला एक महत्त्वाची आज्ञा दिली होती की कलियुगात तू नामदेव म्हणून जन्म घे आणि भक्तीचा असा प्रसार कर की जिथे ज्ञानापेक्षा प्रेमाला आणि नामाला जास्त महत्त्व असेल याच दैवी आज्ञेचे पालन करण्यासाठी शके ११९२ मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीला हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या गावात दामाशेठ शिंपी आणि गोणाई यांच्या पोटी नामदेवांचा जन्म झाला नामदेवांचं बालपण म्हणजे निव्वळ भोळ्या भक्तीचा खजिना होता एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की नामदेवा मी बाहेर जातोय तू देवाला नैवेद्य भरव नामदेवांनी विठ्ठलाच्या मूर्तीसमोर दुधाचा वाटी धरली आणि हट्ट धरला की देवा जोपर्यंत तू जेवणार नाहीस तोपर्यंत मी सुद्धा अन्नाचा कण तोंडात लावणार नाही या चिमुरड्याच्या निस्सीम प्रेमापोटी आणि त्या पुराव्यासाठी साक्षात पांडुरंगाने प्रकट होऊन तो नैवेद्य ग्रहण केला ही घटना केवळ कथा नाही तर ती नामदेवरायांच्या सख्य भक्तीची मोठी साक्ष आहे

सुरुवातीच्या काळात नामदेवराय विठ्ठलाच्या सगुण रूपात म्हणजे फक्त त्या मूर्तीमध्येच अडकून पडले होते पण जेव्हा त्यांची भेट संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांशी झाली तेव्हा त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं मुक्ताबाईंनी घेतलेल्या परीक्षेत नामदेवांचे मडके कच्चे ठरले कारण त्यांना वाटायचं की देव फक्त पंढरपुरात आहे ज्ञानेश्वरांच्या सल्ल्यानुसार ते विसोबा खेचर यांच्याकडे गेले जेव्हा नामदेव मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की गुरुंचे पाय चक्क पिंडीवर आहेत नामदेवांनी आक्षेप घेतला तेव्हा विसोबा खेचर म्हणाले की नामदेवा जिथे देव नाही तिथे माझे पाय नेऊन ठेव नामदेवांनी गुरुंचे पाय जिथे जिथे हलवले तिथे तिथे नवी पिंड दिसू लागली या चमत्काराने नामदेवांना अद्वैत ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यांना कळलं की देव केवळ मूर्तीत नसून तो चराचरात भरलेला आहे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा वैचारिक पुरावा ठरला

नामदेव महाराजांनी विठ्ठलाच्या चरणी बसून एक अफाट संकल्प केला होता तो म्हणजे शंभर कोटी अभंग रचण्याचा ही केवळ एक संख्या नव्हती तर तो भक्तीचा महासागर होता अहो मंडळी विचार करा त्या काळात नामदेवरायांच्या सोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब म्हणजे पत्नी राजाई मुले आणि दासी जनी सुद्धा अभंग रचत असत नामा म्हणे या मुद्रेने त्यांनी विठ्ठलाची अशी महती गायली की महाराष्ट्राच्या घराघरात विठ्ठल पोहोचला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर नामदेवराय विरहाने व्याकुळ झाले आणि त्यांनी भारतभ्रमण करायचं ठरवलं ते फिरत फिरत पंजाबमध्ये पोहोचले आणि आयुष्याची शेवटची २० ते २५ वर्षे त्यांनी पंजाबमधील घुमान येथे व्यतीत केली तिथे त्यांनी हिंदी भाषेत सुद्धा अनेक पदे रचली त्यांच्या भक्तीचा प्रभाव इतका मोठा होता की आजही शीख धर्माच्या पवित्र गुरु ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेव महाराजांचे ६१ शबद म्हणजेच अभंग समाविष्ट आहेत हा इतिहासातील सर्वात मोठा पुरावा आहे की महाराष्ट्राचा एक संत पंजाबच्या मातीत बाबा नामदेवजी म्हणून पुजला जातो

आयुष्याचा शेवटचा काळ त्यांनी पंढरपुरात घालवायचं ठरवलं त्यांना वाटलं की आपल्या देहाची राख सुद्धा विठ्ठलाच्या चरणाशी असायला हवी म्हणून त्यांनी देवाला एक मागणं मागितलं की देवा मला तुझी पायरी कर जेणेकरून तुझ्या दर्शनाला येणाऱ्या संतांची आणि भक्तांची पायधूळ माझ्या अंगावर पडेल शके १२७२ मध्ये त्यांनी विठ्ठल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर समाधी घेतली जिला आपण आजही नामदेव पायरी म्हणून ओळखतो पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाआधी या पायरीला वंदन करतो कारण इथूनच खऱ्या भक्तीची सुरुवात होते

आता सर्वात महत्त्वाचं आणि थक्क करणारं रहस्य म्हणजे नामदेवराय आणि तुकोबांचं नातं नामदेवरायांनी शंभर कोटी अभंगांची जी प्रतिज्ञा केली होती ती त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाही त्यांचे ९४ कोटी अभंग पूर्ण झाले होते आणि ६ कोटी अभंग शिल्लक राहिले होते ही उरलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठीच सुमारे ३०० वर्षांनंतर त्यांनी देहूच्या मातीत तुकाराम म्हणून अवतार घेतला असा वारकरी संप्रदायाचा ठाम विश्वास आहे याला मोठा पुरावा म्हणजे तुकाराम महाराज स्वतः त्यांच्या अभंगात क्रमांक १३२० मध्ये सांगतात की नामदेवे केले स्वप्नामाजी जागे सवे पांडुरंगे येवोनिया याचा अर्थ असा की पांडुरंगाने नामदेवरायांना सोबत घेऊन तुकोबांच्या स्वप्नात येऊन सांगितलं की जी प्रतिज्ञा नामदेवाने केली होती ती आता तुला पूर्ण करायची आहे या स्वप्नानंतरच तुकोबांच्या मुखातून अभंगाची गंगा वाहू लागली म्हणूनच वारकरी संप्रदायात नामदेव तोचि तुका ही भावना अढळ आहे नामदेवांची ती भोळी भक्ती आणि तुकोबांचं ते प्रखर वैराग्य म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत

संत नामदेव महाराज हे भक्तीचं असं विद्यापीठ आहेत जिथे जात पात भाषा आणि प्रदेशाच्या सगळ्या भिंती गळून पडतात त्यांनी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणत जो मार्ग दाखवला तो आजही कोट्यवधी लोकांसाठी शांतीचा मार्ग आहे सत्ययुगाचा प्रल्हाद त्रेतेचा अंगद द्वापाराचा उद्धव कलियुगाचे नामदेव आणि शेवटी तुकोबा हा प्रवास म्हणजे भगवंताने आपल्या भक्तासाठी केलेली एक दिव्य लीलाच आहे नामदेव पायरीवर नतमस्तक होणं म्हणजे केवळ एका संताला वंदन करणं नसून युगांयुगांच्या त्या निस्सीम प्रेमाला वंदन करणं आहे ही कथा आणि हे पुरावे आपल्याला एकच शिकवतात की नामाचा गजर केला तर देव सुद्धा भक्ताचा ऋणी होतो

मंडळी तुम्हाला काय वाटतं नामदेवरायांचा हा विराट प्रवास वाचून तुमच्या मनातही त्या विठ्ठलाच्या भक्तीची ज्योत पेटली असेलच ना ही माहिती आणि हे पुरावे केवळ स्वतःकडे ठेवू नका तर आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा सांगा कारण जेव्हा त्यांना आपले हे संत आणि त्यांचा जागतिक प्रवास कळेल तेव्हाच आपली संस्कृती खऱ्या अर्थाने टिकून राहील तुम्हाला हा लेख कसा वाटला आणि पुढच्या वेळी कोणत्या संतांबद्दल किंवा विषयाबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा

चला तर मग पुन्हा भेटूच अशाच एका रंजक, माहितीपर विषयावर बोलण्यासाठी तोपर्यंत सावधान राहा विवेकाने वागा आणि आपल्या सनातनी संस्कृतीचा अभिमान बाळगा

जयोस्तुते

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल


टिप्पण्या