लाडकी बहिणींसाठी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खुश्कीचा मार्ग
लाडकी बहिण योजनेचे KYC करण्यासाठी अनेकांना दिवसभर त्रास होतोय. आधार नंबर टाकल्यानंतर पुढचा पर्यायच दिसत नाही. कारण साधे आहे एकाच वेळी राज्यभरातून हजारो महिला प्रयत्न करत असतात. साइटवर प्रचंड गर्दी होते आणि प्रक्रिया अडकते.
उपाय सोपा आहे दिवसभर डोके खपवण्यापेक्षा मध्यरात्रीनंतर प्रयत्न करा. त्या वेळी पोर्टलवर गर्दी कमी असते आणि KYC प्रक्रिया पटकन पूर्ण होते.
काय लागेल :-
स्वतःचे आधारकार्ड
विवाहित असल्यास पतीचे आधारकार्ड अविवाहित असल्यास वडिलांचे आधारकार्ड
आधारकार्डाशी जोडलेला मोबाईल फोन जवळ ठेवणे आवश्यक आहे
बस्स अवघड काहीच नाही
लक्षात ठेवा
सायबर कॅफेत वारंवार जाणे पैसे घालवणे काही उपयोगाचे नाही
युट्यूबवर 10 ते 15 मिनिटांचा वेळ वाया घालवणारे तज्ञ टाळा ते फक्त आपला वेळ आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी अनावश्यक फुगा करतात
खरी माहिती दोन वाक्यांत सांगता येते त्यासाठी तुमचा वेळ आणि संयम वाया घालवू नका
KYC प्रक्रिया करण्यासाठी लाभार्थी महिलेचे आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे. प्रमाणीकरण करताना आधारकार्डाशी जोडलेला मोबाईल नंबर सक्रिय असणे आवश्यक आहे कारण OTP द्वारेच प्रक्रिया पूर्ण होते.
ही प्रक्रिया केवळ अधिकृत लाडकी बहिण पोर्टलवरच करायची आहे. आधार तपासणी आणि पडताळणी ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होते. जिल्हा कार्यालये किंवा इतर कोणत्याही वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध नाही.
शेवटचा शब्द
लाडकी बहिण पोर्टलचे KYC हे काही कठीण काम नाही. फक्त योग्य वेळ साधा रात्री 12 नंतर. आणि आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा. झाले....
नोंदणी करण्यासाठी राज्यातील अनेक महिला दिवसभर प्रयत्न करतात त्यामुळे वेबसाइटवर प्रचंड ट्रॅफिक टाळण्यासाठी हा एक खुश्कीचा मार्ग आहे. कदाचित महिलाना होणारा त्रास पाहता महाराष्ट्र सरकार सर्वर अजून शक्तिशाली करण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ज्या महिलाना KYC लवकरात लवकर पूर्ण करायची घाई आहे त्याच्यासाठी हा पर्याय सुचवत आहे.
नवीन अश्याच लेख, माहितीसाठी नक्की फॉलो करा, शेयर करा,लाइक करा म्हणजे अशीच माहिती गरजू व्यक्तींपर्यंत पोहचण्यास मदत होईल.
पुढच्या लेख घेऊन येईपर्यंत एक छोटासा स्वल्पविराम...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा