गाजावाजा असलेला क्रिकेटचा सामना भारत विरुद्ध पोर्किस्तान
मैत्री जशी पारखून करावी असे म्हणतात तसेच शत्रुत्व करणे यासाठी देखील एक दर्जा लागत असावा असे माझे म्हणणे आहे. टुकार, दलिंद्रा आणि लायकी नसलेल्या शत्रूवर विजय मिळवल्यानंतर मानसिक समाधान मिळत नाही अश्याच पोर्किस्तान विरुद्ध उद्या बहुचर्चित असा सामना उद्या रंगणार आहे पण त्यांचा संघ आणि एकूण त्याची कामगिरी इतकी ढिसाळ असते की खरच उद्याच्या सामन्याला इतके महत्व देणे खरंच योग्य आहे का? माझ्या मते नाही. पूर्वी ते एकमेकांच्या समोर यायचे त्यात आजकाल जसे ठरवून एकच ग्रुप मध्ये ठेवतात तस व्ह्यायचे नाही. त्याचा तो षंडपणा, पाठीत खंजीर मारण्याचा स्वभाव, वेळोवेळी केलेली युद्ध, काश्मीर मिळवण्याचा अट्टाहास, दहशतवादी कारवाया, भारतातील मुसलमानांना धर्माच्या नावाखाली कानपिचक्या देत देशात होणारे बॉम्बस्फोट, त्यात निर्दोष भारतीय जनतेचे आणि सैनिकाचे जाणारे जीव यामुळे त्या कर्मदळींद्र्या देशाबद्दल एक प्रचंड राग मनात असायचा त्यात भारतीय संस्कृतीनुसार पाहिला हल्ला न करण्याचा अलिखित नियम पाळण्याची शपथ यामुळे शत्रूला गारद होताना पाहण्याची जी मनात इच्छा असायची ती क्रिकेटच्या सामन्याने पूर्ण व्हायची म्हणून भारत विरुद्ध पोर्किस्तान क्रिकेट सामने नको इतके प्रसिद्ध झाले. एकवेळ विश्वचषक जिंकू नका पण ह्या लांड्याना हरवा अश्या वावड्या त्याकाळी बाहेर यायच्या पण काळाच्या ओघात आता ठरवून एकमेकांसमोर आणून होत असलेले सामने, त्या सामन्याला मीडियात मिळणारा प्रचंड पाठिंबा आणि त्यातून पैसे कमावण्याची संधी स्पर्धेच्या नियोजन करणाऱ्यात निर्माण झाल्यापासून हे सामने अक्षरशः नावडती भाजी असूनही सासरचे लोक आग्रह करत ताटात वाढून जातात त्यावेळी जसे वाटत तशीच भावना आता निर्माण होते. पूर्वी ह्या पोर्किस्तान समोर भारतीय संघ नेमका गहाळ पडायचा पण नंतर ही परिस्थिती बदलली आणि जेव्हा भेटेल तेव्हा ह्या लांड्याना भारताने लोळवले. एखाद दुसरा अपवाद आणि केवळ नशिबाने जिंकलेले एखाद दुसरा सामना याच्या जोरावर किती दिवस ह्या भ्याड, बिनडोक, लायकी नसणाऱ्या संघाबरोबर शत्रुत्व, बिगेस्ट रायवरली म्हणत खेळत बसायचे? शत्रूला चितपट करायचे म्हणजे त्याच्याबरोबर लुटुपुटूची लढाई खेळायची की दहशतवादी देशाबरोबर खेळणार नाही असा निर्णय करायचा? एक सर्वसाधारण सामना त्याला उगाच हाइप करून मोठे करण्यात अर्थकारण आहे पण त्यामुळे देशहित, शत्रूला कायमचे नामोहरण करण्याची सुवर्ण संधी भारत सोडतेय अस का नाही वाटत? दोन्ही संघाची तुलना केली तरी सामन्याचा निकाल 99% भारतच्या बाजूने लागणार हे जवळपास निश्चित पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ त्यामुळे केवळ तुक्कागिरीवर पोर्किस्तान जिंकण्याची शक्यता केवळ 1% असताना का खेळायचे ह्या टुकार संघाविरुद्ध? ह्याचा पंतप्रधान असो की तेथील जनता ह्याच्या मनात भारताबद्दल जो द्वेष भरलेला आहे तो वेळोवेळी त्याच्या टीकाटिपणी मध्ये आपल्याला समजत असतो तरीही केवळ प्रसिध्दी मिळिण्याकरिता मीडियात आपलेच खेळाडू कसे अस्सलखित खोटे दामटवत असतात हे कुठेतरी थांबले पाहिजे. सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे हे भिकारडे आता परत भारतीय भूमीवर खेळणार नाहीत. जरी भविष्यात हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले तरी यापुढे ते भारतात येवून खेळतील अस वाटत नाही कारण भारतीय संघ पोर्किस्तान मध्ये जात नाही पण केवळ इथेच न थांबता यापुढे त्या दहशतवादी देशाला कोणतीही स्पर्धा नियोजन करण्याची संधी मिळणार नाही किंवा हळूहळू बहिष्कृत करून क्रिकेट खेळातून हद्दपार करण्यात जो आनंद आहे तो फुटकळ सामना जिंकण्यात नक्कीच नाही.
असो.
जयोस्तुते म्हणत माझे दोन शब्द संपवतो
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा