दशावतार: वराह अवतार

वराह अवतार: भगवान विष्णूचा तिसरा अवतार आणि हिरण्याक्ष असुराची कथा

भगवान विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार, जो सृष्टीच्या पुनर्स्थापनेसाठी घेतला गेला. या अवताराने सृष्टीचे रक्षण करून जीवनाचा प्रवाह पुन्हा सुरू केला. वराह अवताराची कथा हिरण्याक्ष असुराशी जोडलेली आहे, ज्याने सृष्टीत अराजकता निर्माण केली होती.

पुराणानुसार, सृष्टीच्या प्रारंभी एक अत्यंत बलवान असुर हिरण्याक्ष होता. त्याने कठोर तप करून प्रचंड शक्ती मिळवली आणि देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या अहंकाराने त्याला पृथ्वीवर वर्चस्व मिळवण्याची इच्छा निर्माण केली. हिरण्याक्षला स्वतःची ताकद दाखवून सृष्टीवर वर्चस्व मिळवायचे होते. हिरण्याक्षाला देवतांचा द्वेष होता. सृष्टीचे संतुलन बिघडवून तो देवतांना अडचणीत आणू इच्छित होता तसेच त्याने भगवान विष्णूंना चिथावून त्यांच्याशी युद्ध करून स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता त्याने आपली ताकद वापरून पृथ्वीला तिच्या स्थानावरून उचलले आणि समुद्राच्या तळाशी नेऊन ठेवले. यामुळे सृष्टीत अराजकता निर्माण झाली. जीवनचक्र ठप्प झाले, आणि देवता असहाय्य होऊन भगवान विष्णूची प्रार्थना करू लागल्या.

भगवान विष्णूंनी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी वराहाचा (डुकराचा) रूप धारण केले. हा वराह रूपाने अत्यंत प्रचंड, तेजस्वी आणि बलवान होता. त्यांनी समुद्राच्या गडद आणि भयाण लाटांमध्ये शिरून आपल्या थोटकांवर पृथ्वीला उचलले आणि सुरक्षित ठिकाणी आणले.हिरण्याक्षाने विष्णूंना रोखण्यासाठी त्यांच्याशी भयंकर युद्ध केले. परंतु भगवान विष्णूंनी आपल्या दिव्य शक्तींचा उपयोग करून हिरण्याक्षाचा वध केला. अशा प्रकारे, पृथ्वी पुन्हा तिच्या स्थानी स्थापन झाली, आणि सृष्टीचे संतुलन पुनर्स्थापित झाले

हिरण्याक्षाचा कृत्य हा अहंकार, अज्ञान, आणि निसर्गाच्या संतुलनाविरोधात जाणाऱ्या वृत्तीचे प्रतीक आहे. भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन सृष्टीचे रक्षण केले, ज्यामुळे धर्म आणि सत्याचा विजय झाला. वराह अवताराने दाखवले की जेव्हा अराजकता आणि अधर्माचा प्रभाव वाढतो, तेव्हा परमेश्वर सृष्टीचे संरक्षण करण्यासाठी अवतार घेतात.

वराह अवताराची कथा सृष्टीतील संतुलन, सत्य, आणि धर्माचे महत्त्व पटवून देते. ही कथा आपल्या जीवनात संकटांचा सामना करण्यासाठी श्रद्धा आणि दृढतेचे प्रतीक आहे.सृष्टीचा पालनकर्ता ही बिरुदावली परत एकदा सिद्ध करत भगवंताने सृष्टीचे रक्षण केले

क्रमशः

जयोस्तुते..



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रपती

तिरुपती बालाजी: जगातील सर्वात श्रीमंत देवाच्या संपत्तीचे 'हे' आहे रहस्य!

मुक्त विद्यालय (Open School)