दशावतार : श्रीराम
हिंदू धर्मात विष्णूचे दहा अवतार मानले जातात, ज्यांपैकी सातवा अवतार म्हणजेच भगवान श्रीराम होय. श्रीराम हे सत्य, धर्म आणि आदर्शांचे प्रतीक आहेत. त्यांच्या चरित्रातून आपल्याला आदर्श राजा, पुत्र, पती आणि मित्र कसा असावा याचे दर्शन होते.
रामायण महाकाव्यात त्यांचे जीवनकार्य वर्णन केले आहे. अयोध्येचा राजा दशरथ यांचे पुत्र म्हणून श्रीराम यांचा जन्म झाला. बालपणीच त्यांनी विश्वामित्र ऋषींबरोबर जाऊन अनेक दैत्यांचा नाश केला. सीतेशी विवाहानंतर, कैकयीच्या इच्छेमुळे त्यांना चौदा वर्षांच्या वनवासाला जावे लागले. या काळात त्यांनी राक्षसांच्या अत्याचारांपासून पृथ्वीचे रक्षण केले.
लंकेचा राजा रावण याने सीतेचे अपहरण केल्यानंतर, श्रीरामाने वानरसेनेच्या मदतीने रावणाचा पराभव केला आणि सीतेची सुटका केली. या युद्धातून सत्य आणि धर्म यांची महत्ता अधोरेखित झाली.
श्रीरामांचे चरित्र प्रत्येकाला जीवनात योग्य मार्ग दाखवते. त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगातून आपल्याला धैर्य, संयम आणि करुणेचे शिक्षण मिळते.
श्रीराम याची कथा आणि त्यातून मिळणारा बोध याबद्दल लिहीत बसले तर एक ग्रंथ लिहला तरी तो पुरेसा ठरणार नाही त्यामुळे थोडक्यात श्रीराम याच्या अवतार कार्याबद्दल माहिती वर नमूद केली आहे.
क्रमशः
जयोस्तुते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा