दशावतार : कूर्म अवतार

दशावतार कथेतील दुसरी कथा म्हणजे कासव रूपातील भगवान श्री विष्णू याचा अवतार. सृष्टीचा तारणहार श्री विष्णू ज्यावेळी सृष्टीवर संकट येते त्यावेळी सृष्टीचे संरक्षण करण्यासाठी तत्पर असतात तीच ही कथा

कूर्म अवताराची विस्तृत कथा

कूर्म अवतार हा भगवान विष्णूचा दुसरा अवतार मानला जातो. या अवताराशी संबंधित कथा समुद्र मंथनाशी जोडलेली आहे, ज्यामध्ये देवता आणि असुरांनी अमृत (अमरत्वाचे द्रव्य) मिळवण्यासाठी परस्पर सहकार्य केले. त्रेतायुगाच्या काळात, एकदा ऋषी, देवता, आणि लोकांना असुरांच्या सततच्या अत्याचारामुळे त्रास सहन करावा लागला. देवतांचे सामर्थ्य कमी झाले होते. तेव्हा सर्व देवतांनी भगवान विष्णूंच्या चरणी जाऊन प्रार्थना केली. विष्णूंनी त्यांना सल्ला दिला की, अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करावे लागेल, ज्याने त्यांचे सामर्थ्य परत मिळेल. परंतु मंथनासाठी असुरांचेही सहकार्य आवश्यक होते. असुरांना मंथनातून मिळणाऱ्या वस्तूंचा मोह दाखवत त्यांना कार्यासाठी तयार करण्यात आले

समुद्र मंथनाची तयारी

1. मंदराचल पर्वत: मंथनासाठी मथानी म्हणून मंदराचल पर्वत निवडला गेला.

2. नागराज वासुकी: दोरी म्हणून वासुकी नागाचा उपयोग करण्यात आला.

3. समुद्र: क्षीरसागर (दूधाचा समुद्र) मंथनासाठी निवडला गेला.

मुख्यत्वकरून अमर करणारे अमृत आणि त्यामुळे मिळणाऱ्या अद्भुत शक्ती याचमुळे असुर आणि देवता ह्या परस्पर विरोधी गट एकत्र काम करण्याचा हा पहिलाच अनुभव होता. मंथन क्षीरसागरमध्ये करण्यासाठी सगळी तरी केल्यानंतर मंदराचल पर्वत समुद्रात बुडू लागला, कारण त्याला आधार देणारा कोणीच नव्हता. देवता आणि असुर घाबरले आणि पुन्हा भगवान विष्णूंना प्रार्थना केली. तेव्हा भगवान विष्णूंनी कूर्म (कासव) रूप धारण केले आणि समुद्रात उडी घेतली. त्यांनी आपली विशाल पीठ समुद्राच्या तळाशी दिली आणि त्यावर मंदराचल पर्वत स्थिर केला. असुर आणि देवता यांनी संपूर्ण जोर लावून केलेल्या पहिल्याच प्रयत्नात हलाहल विष बाहेर आले. विष इतके प्रभावी होते की केवळ त्याच्या दर्पाने असुर आणि देवता याच्या तब्बेती खराब होवु लागल्या अश्यावेळी भगवान श्री भोलेनाथ समोर आले आणि त्यांनी ते हलाहल विष आपल्या कंठात सामावून घेतले. म्हणूनच श्री भोलेनाथ यांना नीलकंठ म्हणून देखील बोलले जाते.

पहिल्याच प्रयत्नातून निर्माण झालेले संकट दूर झाले तरी असुर आणि देवता दोघे भयभीत झाले होते पण अमृताच्या हव्यासाने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले त्यानंतर मंथनातून निघालेले 14 अमूल्य रत्न खालीलप्रमाणे

1. लक्ष्मी (धन व समृद्धीची देवी)

2. कामधेनू (इच्छापूर्ती गाय)

3. कल्पवृक्ष (इच्छापूर्तीचे झाड)

4. चंद्र (चंद्रदेव)

5. पारिजात (स्वर्गातील सुगंधी वृक्ष)

6. शंख

7. धन्वंतरी (औषधांचे देव)

8. अमृत (अमरत्व प्रदान करणारे अमृत)

(काही कथांमध्ये मिळणाऱ्या वस्तू यांच्यामध्ये काही फरक आहे मात्र साधारण पणे वरील वस्तून मंथनातून बाहेर आल्या अस समजलं जात)

अखेर, देवांनी अमृत प्राप्त केले आणि त्यांच्यातील सामर्थ्य पुन्हा परत आले. ही कथा हे शिकवते की, जेव्हा मोठे कार्य करायचे असेल, तेव्हा धैर्य, सहकार्य, आणि भगवान विष्णूंसारख्या संरक्षकाची आवश्यकता असते.

अवतार म्हणजे सृष्टीला वाचवण्यासाठी घेतलेले रूप, जन्म त्यामुळे मंथनातून मिळणाऱ्या अमृताचे केवळ देवांना ग्रहण करता यावे म्हणून भगवान श्री विष्णू यांनी मोहिनी रूपाचे काही तज्ज्ञ अवतार म्हणून उल्लेख करत असेल तरी माझ्या मते तो अवतार नसावा. अश्या प्रत्येक रूपाला अवतार मानले तर भगवान श्री विष्णू यांचे अनेक अवतार आणि त्याची माहिती देणे खूप अवघड होईल त्याचमुळे महत्त्वाचे आणि प्रमुख अश्या सृष्टीच्या संरक्षणासाठी घेतलेल्या रुपाना अवतार म्हणण्याचा पायंडा आपल्या सनातन हिंदू धर्मात आहे. 

क्रमशः

जयोस्तुते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रपती

तिरुपती बालाजी: जगातील सर्वात श्रीमंत देवाच्या संपत्तीचे 'हे' आहे रहस्य!

मुक्त विद्यालय (Open School)