हिंसेतून मनोरंजन..विकृती?

फार वर्षांपूर्वी रसेल क्रो चा Gladiator नावाचा एक चित्रपट पाहिला होता ज्यात पूर्वीच्या रोम काळातील राजकारण, सत्ता, कुटुंबातील हेवेदावे, खुर्चीची हाव तसेच समाजाचे एक उत्तम चित्र चित्रित केले होते पण त्या चित्रपटाला प्रसिध्दी मिळण्याचे खरे कारण होते त्यातील ॲक्शन किंवा हिंसात्मक दृश्यांचे चित्रण. चित्रपटात असलेली मारधाड, साहसी दृश्य, शस्त्रांचे अनोख्या पद्धतीने वापर आणि क्रूर पद्धतीने शत्रूचा खातमा करण्याची अघोरी पद्धत भारतीय प्रेक्षकांनी चित्रपटात कदाचित पहिल्यांदाच पाहिली असतील. ह्या चित्रपटात होणारी लढाई, हिंसा हे त्या जुन्या रोम काळातील घटनाचे एक चित्रण होते जे कदाचित त्या काळात घडत असावे किंवा नसेल घडत तरी ते पडद्यावर पाहताना वास्तव वाटत होते, योग्य वाटत होते.
काही वर्षांपूर्वी निशिकांत कामत याचा रॉकी हँडसम हा चित्रपट अश्याच साहसी,क्रूर, पाशवी हिंसेची भरभरून दृश्य असलेला चित्रपट. हा चित्रपटाला एक साजेशी सुंदर गोष्ट होती पण कथेतील नायक ज्याप्रमाणे चाकू, बंदुंकाचा वापर करतोय ते अकल्पनीय होते म्हणजे असे स्टंट हॉलिवूडच्या चित्रपटाचा गाभा असला तरी भारतीय अभिनेता अश्या प्रकारे कत्तल करतो हे सुरुवातीला पाहताना अतिशयोक्ती वाटली पण नंतर काही वर्षांनी ती चित्रपट पाहताना जॉन अब्राहम ह्याच्या मारधाड एन्जॉय देखील केली पण त्यातील काही दृश्य तर अशी अंगावर येतात की माणूस अस कोणाला मारू शकेल यावर विचार करायला भाग पाडते
नुकताच आलेला रणबीर कपूर नायक असलेला ॲनिमल ( म्हणजे मराठीत जनावर ) यातील ॲक्शन देखील अवास्तव आणि अघोरी वाटतील. चित्रपट कथा, त्यातील भाव भावना यापेक्षा जास्त लक्षात राहतो ते या चित्रपटातील साहसी, बटबटीत, ब्रबर हिंसेबद्दल
काही दिवसांपूर्वी आलेला कील चित्रपट म्हणजे एका प्रवासात दरोडेखोरांनी केवळ लूट करण्याच्या हेतूने केलेला हल्ला. लूट करण्याबरोबरच प्रवास करणाऱ्या लोकात भय निर्माण व्हावे म्हणून त्यात केलेला रक्तपात आणि आपला बचाव तसेच आप्त, प्रिय लोकांच्या मृत्यूचा बदला घेणारा नायक त्याची मारामारी अंगावर आल्याशिवाय राहणार नाही
असाच एक चित्रपट बाजारात आलाय ज्याचे नाव मायको. मी तुमच्याशी पैंज लावतो की असा हिंसा प्रमुख चित्रपट तुम्ही आजपर्यत पाहिला नसेल. ह्या चित्रपटात हिंसेची, क्रूरतेची जी पातळी ओलांडली आहे ती कोणत्याही चित्रपटात पहायला मिळाली असेल अस वाटत नाही. हा चित्रपट पाहताना त्यातील कथा यापेक्षा महत्त्वाचे स्थान यातील रक्तपात आहे हे अधोरेखित होते. शत्रुत्व, बदला घेण्यासाठी होणारा हा रक्तपात पाहण्याची शक्ती सगळ्याच लोकात असेल असे नाही. रक्ताचे सडे, वेगवेगळ्या हत्यारांनी गळे चिरणे, शरीराचे भाग वेगळे करणे, ऍसिड मध्ये जिवंत माणसाला टाकण, संपूर्ण कुटुंबाची क्रुरतेच्या परिसीमा गाठत संपवणे हे सगळे पाहणे, अनुभवणे एक विचित्र अनुभव आहे.

असे अनेक अजून चित्रपट नक्कीच आहे पण हिंसेची परिसीमा गाठणाऱ्या काही चित्रपटाचा लेखाजोगा तुमच्यासमोर मांडला तो हिंसा,क्रूरता म्हणजे मनोरंजन का? असा प्रश्न पडल्याने.
हे सगळ कशासाठी तर मनोरंजन. खरंच हे मनोरंजन आहे का? सिनेमा समाजाचा आरसा असतो तर असा निष्टुर समाज आहे का? सिनेमातून चांगलं दाखवल की समाज चांगला घडत नाही पण वाईट गोष्टींचे अनुकरण करणारे कमी नाही उदाहरणार्थ तो पुष्पा. कसे सगळे लहान थोर त्याचे अनुकरण करत खांदा वर कर, नसलेली असलेली दाढी खालून हात फिरवत, झुकेगा नही म्हणत तुम्ही पाहिले असल हे नक्की. चित्रपटातील हिंसाचार पाहून खलनायकी वृत्ती समाजातील काही लोकांच्या अंगात भिनत आहे म्हणूनच शिक्षणाच्या माहेर घर, पुण्यनगरी म्हंटले जाणाऱ्या शहरात आजकाल कोयते गँग दहशत वाढत नसावी का? हिंसात्मक चित्रपट समाज घडवेल की बिघडवेल? चित्रपटातून नक्की कोणती शिकवण मिळते? मुळात हे चित्रपट म्हणजे मनोरंजन आहेत का ह्या प्रश्नाचे उत्तर मी नाही तर आपण शोधायचे आहे. हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारा आणि उत्तर कमेंट मध्ये नोंदवा. काय सांगावे आपले मत कोणी महत्वाचा माणूस पाहिलं, त्यावर काही कारवाई घडेल किंवा एखादे ऑनलाईन आंदोलन होईल, वायरल होत समाजाचे विचार चक्षु उघडे होतील.

आज पुरते इतकेच. पुढच्या भेटीपर्यत राम राम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रपती

तिरुपती बालाजी: जगातील सर्वात श्रीमंत देवाच्या संपत्तीचे 'हे' आहे रहस्य!

मुक्त विद्यालय (Open School)