बटोंगे तो कटोंगे

बटोंगे तो कटोंगे

बटोंगे तो कटोंगे

नमस्कार मित्रानो, 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो काही 'धुरळा' उडाला आहे, तो पाहून कोणाचंही डोकं चक्रावून जाईल. सत्ता मिळाली की पदाची भूक वाढणं हे काही मानवी स्वभावाला नवीन नाही, पण ही भूक जेव्हा 'मी आणि माझंच' या अहंकारात रूपांतरित होते, तेव्हा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होतं. विरोधक सध्या 'धपाधप' पोळ्या भाजण्यात दंग आहेत, पण त्यांना माहीत नाही की हा आनंद 'क्षणभंगुर' आहे.

सत्तेचा 'अहंकार' की 'हिंदुत्वाचा' हुंकार? आता वेळ आली आहे कृतीची!

मनात असलेली गोष्ट साध्य झाली नाही की चिडचिड होणं स्वाभाविक असतं. सध्या महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षात नेमकं हेच चित्र दिसतंय. मंत्रीपद न मिळाल्यामुळे अनेक नेते निराश आहेत, कुणी उघड तर कुणी आडपडद्याने आपली नाराजी व्यक्त करतंय. पण खरा 'तमाशा' तर विरोधी पक्ष करत आहे. ज्यांना जनतेने नाकारलं, ती आज सत्ताधाऱ्यांच्या नाराजीवर आपली राजकीय पोळी भाजण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्षात दरी निर्माण कशी होईल, यासाठी विरोधक देव पाण्यात घालून बसलेत. पण महाराष्ट्राच्या जनतेने जो जनादेश दिला आहे, तो कोणत्याही एका व्यक्तीला खुश करण्यासाठी नाही, तर 'बदल' घडवण्यासाठी दिला आहे.
एकाच खुर्चीला वर्षानुवर्षं चिकटून राहणाऱ्यांना हे समजलं पाहिजे की, बदल हा काळाचा नियम आहे. जर जुन्याच लोकांनी जागा अडवून ठेवली, तर नवीन पिढीने मंत्रिपद आणि कामाचा अनुभव कधी घ्यायचा? "मलाच मिळावं" हा 'मीपणा' सत्तेच्या हव्यासातून येतो, पण तो लोकशाहीला घातक आहे. वेळ ही सर्वात मोठी गुरु असते आणि लवकरच या नेत्यांना वेळेचं महत्त्व कळेल अशी अपेक्षा आहे. विरोधकांचा हा आनंद 'चिरकाल' नाही, कारण ही अंतर्गत धुसफूस लवकरच शांत होईल; पण खरी परीक्षा पुढे आहे.

घोषणांच्या पलीकडचं 'हिंदुत्व'

निवडणुकीच्या काळात 'एक हैं तो सेफ हैं' आणि 'बटेंगे तो कटेंगे' अशा घोषणांनी वातावरण तापवलं होतं. पण या घोषणा केवळ मतदारांना आकृष्ट करण्यासाठी नव्हत्या, हे आता सत्तेत बसलेल्या नेत्यांना सिद्ध करावं लागेल. संघटित होऊन सत्तेचा वापर हा केवळ गाड्या आणि बंगल्यांसाठी नसावा, तर तो अनियंत्रित असलेल्या कट्टरपंथीय आणि धर्मांध प्रवृत्तींना लगाम घालण्यासाठी असायला हवा. ज्या हिंदूंच्या जिवावर आणि मतांवर तुम्ही या खुर्च्या मिळवल्या आहेत, त्यांच्या संरक्षणासाठी, मंदिरांच्या पावित्र्यासाठी आणि आपल्या परंपरा टिकवण्यासाठी सरकारला आता कंबर कसावी लागेल.
केवळ निवडणुका आल्या की हिंदुत्वाची दिवटी पेटवायची आणि सत्ता मिळाल्यावर ती विझवून टाकायची, अशा ढोंगी लोकांना ईश्वर कधीच माफ करणार नाही.

आता वेळ 'निपटारा' करण्याची!

आज रस्त्याच्या कडेला, रेल्वे स्टेशन्सवर, गड-किल्ल्यांवर आणि रिकाम्या जागांवरील अतिक्रमणांच्या माध्यमातून जो 'लँड जिहाद' फोफावतोय, त्याला वेळीच रोखणं गरजेचं आहे. हिंदू महिलांना फसवून, त्यांच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या 'लव्ह जिहाद'चा पूर्णतः बिमोड करण्यासाठी कठोर कायदे आणि त्याची अंमलबजावणी हवी. मदरशांमधून दिला जाणारा कट्टर विचार रोखणं आणि संपूर्ण समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'सेक्युलर' होण्याचं प्रमाणपत्र फक्त हिंदूंनीच का द्यावं? हलाला, बुरखा आणि पाच वेळा होणारे ते बेसूर भोंगे... यावर जर आता नियंत्रण आलं नाही, तर कधीच येणार नाही.

दूरदृष्टी की सत्तालोभ?

लोकांना रोजगार हवा आहे, महागाईतून सुटका हवी आहे आणि पारदर्शक कारभारही हवाच. पण त्यासोबतच भविष्यात 'इस्लामी विचारसरणी' देशासाठी काय धोका निर्माण करू शकते, याची दूरदृष्टी असलेलं सरकार आज भारताला हवं आहे. जवळच्या राजकीय फायद्यासाठी दूरच्या संकटाकडे डोळेझाक करणं ही सर्वात मोठी घोडचूक ठरेल. काही सत्तापिपासू नेत्यांनी सत्तेसाठी ज्यांच्या दाढ्या कुरवाळल्या, ती पायवाट उद्या 'दंगली आणि फाळणीचा' महामार्ग होऊ नये, हीच माफक अपेक्षा.
जनतेने तुम्हाला प्रचंड बहुमत दिलं आहे, पण हे यश अपवादाने मिळतं, ते सतत मिळत नाही. त्यामुळे सत्तेचा उपभोग घेण्यात वेळ दवडण्यापेक्षा, भारताला विकसित करण्यासाठी आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी या शक्तीचा वापर करा. अन्यथा, हे अथांग बहुमत आणि ही ताकद... सर्व काही व्यर्थ ठरेल.

जयोस्तुते!
हर हर महादेव!


#महाराष्ट्रराजकारण #हिंदुत्व #विजयदिवस
#MaharashtraPolitics #Hindutva #SanatanVichar


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रपती

तिरुपती बालाजी: जगातील सर्वात श्रीमंत देवाच्या संपत्तीचे 'हे' आहे रहस्य!

मुक्त विद्यालय (Open School)